90 च्या दशकातील हिट बालकलाकार आज अंधारात

बॉलिवुडमध्ये बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केल्यानंतर अनेकांनी पुढे नायक, नायिका, सहनायकाच्या भूमिका साकारून चांगले यश मिळवले होते. यात सारिका, नीतू सिंह, ऋषी कपूर यांचे जसे नाव घेता येईल तसेच आयशा टकिया, हंसिका मोटवानी, जुगल हंसराज, कुणाल खेमू, आफताब शिवदासानी यांनीही बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांनीही तरुणपणात काही सिनेमे केले. मात्र लहानपणी जसे यश मिळवले तसे यश त्यांना मोठेपणी मिळाले नव्हते. प्रत्येक काळात अनेक बाल कलाकार सिनेमात दिसतात. त्यांचे नावही होते. पण पुढे ते यशस्वी होतातच असे नाही. 90 चे दशक बॉलिवुडसाठी खूप आनंदाचे आणि भरभराटीचे होते. अनेक निर्माते बॉलिवुडमध्ये सिनेमे बनवत होते आणि अनेक कलाकारांचा उदयही याच काळात जसा झाला तसाच अनेक बाल कलाकारांचाही उदय झाला होता. 90 च्या दशकातील अनेक नायक-नायिका आजही बॉलिवुडमध्ये सक्रिय आहेत. बाल कलाकार मात्र आज अंधारात गेलेले दिसतात. अशाच 90 च्या दशकातील सुपरहिट पण आता अंधारात असलेल्या बाल कलाकारांवर एक नजर

शाहरुख खान आणि काजोलचा ‘कुछ-कुछ होता है’ हा एक अत्यंत सुपरहिट सिनेमा. या सिनेमात या दोघांच्या मुलीची अंजलीची भूमिका आजही प्रेक्षकांना आठवते. तिचे ते लोभस रुप प्रेक्षकांना खूपच आवडले होते. या मुलीचे नाव होते सना सईद.

‘कुछ कुछ होता है’मुळे सनाचे सगळीकडे नाव झाले होते. त्यानंतर अनेक सिनेमांमध्ये तिला काम करण्याची संधी मिळाली. मोठी झाल्यावर करण जोहरने तिला 2012 मध्ये ‘स्टुडेंट ऑफ द ईयर’ मध्ये काम करण्याची संधी दिली होती. मात्र त्यानंतर सना सिनेमात दिसलीच नाही.

शाहरुख खान काजोलच्याच ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’मध्ये काजोलच्या लहान बहिणीची भूमिका साकारणाऱ्या मुलीने प्रेक्षकांना आकर्षित केले होते. तिचे काम प्रेक्षकांना खूपच आवडले होते. मोठी झाल्यावर ती नक्कीच यशस्वी अभिनेत्री होईल असे म्हटले जात होते. पण झाले उलटेच. पूजा रुपारेल नावाच्या या मुलीला मोठी झाल्यावर सिनेमात कोणी काम दिले नाही. त्या एका सिनेमाने तिला जेवढे यश मिळाले तेवढे यश तिच्या जवळही नंतर फिरकले नाही.

2000 च्या आसपास ‘सोनपरी’ नावाची मालिका प्रचंड यशस्वी झाली होती. जे या काळात लहान होते आणि ही मालिका पाहिली असेल त्यांना यातील फ्रूटी आठवत असेलच. ही फ्रूटी खूपच लोकप्रिय झाली होती..

फ्रूटी झालेली ही मुलगी होती तन्वी हेगडे. तन्वीची लोकप्रियता पाहून प्रख्यात चित्रकार एम. एफ. हुसैन यांनी माधुरी दीक्षित अभिनीत ‘गजगामिनी’मध्ये काम करण्याची संधी तन्वीला दिली होती. या सिनेमात तिने बेबी शकुंतलाची भूमिका साकारली होती. त्यानंतर तन्वीने ‘चॅम्पियन’, ‘विरुद्ध’, ‘वाह लाईफ हो तो ऐसी’ आणि मराठी चित्रपट ‘अथांग’मध्ये काम केले होते. आता मात्र तन्वी कुठेही दिसत नाही.

2003 मध्ये ‘करिश्मा का करिश्मा’ नावाची एक मालिका त्या काळात खूपच लोकप्रिय झाली होती. यात एका गोंडस रोबोटने सगळ्यांना वेड लावले होते. रोबोटची भूमिका साकारणाऱ्या या मुलीचे नाव आहे झनक शुक्ला. झनक ही छोट्या पडद्यावरील प्रख्यात अभिनेत्री सुप्रिया शुक्ला आणि सिनेनिर्माता हरील शुक्ला यांची मुलगी. झनकने शाहरुख खानसोबत ‘कल हो न हो’मध्येही काम केले होते. झनक आता में भी काम किया था। झनक आता मोठी झाली असून सुंदरही दिसते, पण तिला सिनेमात किंवा मालिकांमध्येही कोणी काम दिलेले नाही.

कुणाल खेमूनेही ‘राजा हिंदुस्तानी’, ‘जख्म’, ‘हम हैं राही प्यार के’ सिनेमात बाल कलाकार म्हणून काम करताना प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. अजय देवगणच्या ‘जख्म’ सिनेमात कुणालने दाखवलेल्या अभिनयावर सगळेच फिदा झाले होते. परंतु मोठा झाल्यावर कुणालने काही सिनेमांमध्ये नायक म्हमून काम केले. परंतु त्याला यश मिळाले नाही. सध्या तो सैफ अलीची बहिण सोहा अलीचा पति म्हणून ओळखला जात आहे. यावरून सध्या तो किती यशस्वी आहे याची कल्पना येते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER