घराला लागलेल्या आगीत जळून चिमुरडीचा मृत्यू

ablaze

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील पेठवडज शिवारातील शेतात असलेल्या घराला दिव्याने लागलेल्या आगीत होरपळून एका अडीच वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झालाय. यामुळं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पल्लवी अशोक तरपेवाड असे मृतक चिमुरडीचा नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,’ साडू अशोक हणमंत तरपेवाड हे पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी मुलगी पल्लवीसोबत पेठवडज शिवारातील शेतात राहत असलेले नामदेव नागोराव बोडलंवाड यांच्या घरी आले होते. यावेळी गुरुवारी मध्यरात्री अचानक घराला आग लागली. ही आग एवढी भीषण होती यात पल्लवीचा होरपळून मृत्यू झालाय. तर बोडलंवाड यांच्या घरातील सर्वच साहित्य जळून खाक झालं असून मोठं नुकसान झालं आहे.