राज्यपाल? नाही…केरळात भाजपची सत्ता आल्यास व्हायचे आहे : ई श्रीधरन

E Sreedharan

त्रिवेंद्रम :- मेट्रोमॅन म्हणून ओळख असलेले ई श्रीधरन (E. Sreedharan) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश करण्यापूर्वी मोठं विधान केलं आहे. मला राज्यपाल होण्यात कुठलाही रस नाही. केरळमध्ये भाजपची सत्ता स्थापन झाल्यास केरळचा मुख्यमंत्री व्हायला मला आवडेल, असं विधान श्रीधरन यांनी केलं. श्रीधरन हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्यापूर्वीच त्यांनी हे मोठं विधान करून भाजप प्रवेशाबाबतचे संकेत दिले.

ई श्रीधरन यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आपली इच्छा बोलून दाखवली. केरळमध्ये भाजपची सत्तास्थापन झाल्यास राज्याला कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करण्यावर आणि आधारभूत संरचना विकसित करण्यावर आपला भर असेल. केरळात भाजची सत्ता यावी हे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवूनच मी राजकीय दंगलीत उतरणार आहे. राज्याच्या हितासाठी मी काम करणार आहे, असं श्रीधरन यांनी सांगितलं.

मोदींचा आदर…

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याशी असलेल्या संपर्काबाबतही त्यांनी मौन सोडलं. जेव्हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा अनेक विकास प्रकल्पांच्या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा व्हायची. मी त्यांचा आदर करतो. भाजपमध्ये प्रवेश करण्याचं तेही एक कारण असू शकत. केरळमध्ये भाजपची सत्ता आल्यास मुख्यमंत्रीपदाची धुरा हाती घेण्यास मी तयार आहे. मला राज्यपाल होण्यात रस नाही. ज्यांच्याकडे काहीच अधिकार नसते अशा प्रकारच्या संवैधानिक पदावर राहून राज्याच्या विकासासाठी योगदान देता येणार नाही, असंही श्रीधरन यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER