मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्र्यांचे महान आद्यक्रांतीवीरास अभिवादन

UDdhav Thackeray

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मातोश्री (Matoshree) निवासस्थानी आद्यक्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

महान आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांचे स्वातंत्र्याच्या लढ्यात मोलाचे योगदान होते. ब्रिटिशांच्या विरोधात तळागाळातील लोकांकडून उठाव घडवून आणण्यात राजे उमाजी नाईक यांनी मोलाची कामगिरी केली. त्यांनी ‘स्वातंत्र्याचा जाहीरनामा’ काढून अनेक घटकांना संघटित करण्याचे प्रयत्न केले. ब्रिटिशांना पळवून लावणा-या राजे उमाजींना देहदंडाला सामोरे जावे लागले होते अशा या महान आद्यक्रांतीवीरास विनम्र अभिवादन असा संदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

आद्यक्रांतिवीर नरवीर राजे उमाजी नाईक

राजे उमाजी नाईक यांचा जन्म ७ सप्टेंबर १७९१ ला झाला होता. तर मृत्यू ३ फेब्रुवारी १८३२ ला. ते भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील प्रथम आद्यक्रांतिकारक होते.

उमाजीराजे नाईक यांनी इंग्रज, सावकार,मोठे वतनदार अशा लोकांना लुटून गोरगरिबांना आर्थिक मदत करण्यास सुरवात केली. इंग्रजांना त्रास दिल्यामुळे उमाजीराजेंना सरकारने इ.स. १८१८मध्ये एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा दिली. परंतु तो काळ सत्कारणी लावत त्यांनी त्याकाळात तुरंगात लिहिणे वाचणे शिकले .या घटनेचे इंग्रज आधिकारी कॅप्टन मॉकिनटॉस याने फार आश्चर्य व कौतुक केले.आणि तुरूंगातून सुटल्यानंतर इंग्रजांविरुद्धाच्या त्यांचा कारवाया आणखी वाढल्या.

उमाजीराजेंनी १६ फेब्रुवारी १८३१ रोजी इंग्रजी सत्तेविरुद्ध एक जाहीरनामाच प्रसिद्ध केला. त्यात नमूद केले होते की, “लोकांनी इंग्रजी नोकऱ्या सोडाव्यात. सर्व राजे रजवाडे ,सरदार जमीनदार, वतनदार,देशवासीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी बंड पुकारावे आणि इंग्रजांविरुद्ध अराजकता माजवावी. इंग्रजांचे खजिने लुटावेत. इंग्रजांना शेतसारा,पट्टी देऊ नये.असे करणाऱ्यास नवीन सरकारमधून जहागिरी,इनामे वा रोख पैशाची बक्षीसे मिळतील.ज्यांची वंशपरंपरागत वतने,तनखे,इ.इंग्रज सरकारमुळे गेले असतील ती सर्व त्यांना परत केली जातील. इंग्रजांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार आहे व नवीन न्यायाधीष्ठीत राज्याची स्थापना होइल. इंग्रजांना कोणीही मदत करू नये तसे केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करेल” असे सांगून उमाजीराजेंनी एकप्रकारे स्वराज्याचा पुकारच केला होता. संपुर्ण क्रांतिकारकांचा इतिहासात अशा प्रकारचा व्यापक जाहिरनामा प्रथमच दिसतो.हे भारताच्या इतिहासातील सोनेरी पानच आहे.म्हणूनच उमाजीराजे हे आध्यक्रांतिकारक ठरतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER