मुख्यमंत्र्यांची आदर पूनावालांशी चर्चा; राज्याला २० कोटी लसींची गरज

Maharashtra Today

मुंबई :- केंद्र सरकारने १ मेपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्याची मुभा दिली आहे. आता ठाकरे सरकारने सीरम इन्स्टिट्यूटकडून कोविशिल्ड लस मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख आदर पूनावाला (Adar Poonawala) यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे.माहितीनुसार, महाराष्ट्राला २० कोटी लसींची गरज आहे. १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाची मुभा मिळाली आहे. यासाठी ५.५ कोटी लसींची गरज नव्याने निर्माण झाली आहे.

यासंदर्भात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आदर पूनावाला यांच्याशी चर्चा केली. सध्या लसीच्या तुटवड्यामुळे महाराष्ट्रातील अनेक लसीकरण केंद्रे  बंद आहेत. अशातच आता केंद्राच्या नव्या नियमानुसार प्रत्येक राज्याला ५० टक्के लसींचा साठा हा थेट लसनिर्मात्या कंपन्यांशी बोलणी करून विकत घ्यावा लागणार आहे. या दृष्टीने ठाकरे सरकारने पावले टाकायला सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने ५० टक्के लसींचा साठा खरेदी करण्याची जबाबदारी राज्यांवर टाकली आहे.

त्यामुळे आता राज्यांना कोविशिल्डचे उत्पादन करणारी सीरम आणि कोवॅक्सीन लस तयार करणाऱ्या भारत बायोटेकशी थेट बोलावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने सीरमच्या आदर पूनावालांशी चर्चा करून लस पुरवण्याची मागणी केली. २४ मे रोजी  सीरममध्ये उत्पादित होणाऱ्या लसी केंद्र सरकारने आधीच बुक करून ठेवल्या आहेत, असे आदर पूनावाला यांनी सांगितले. त्यामुळे महाराष्ट्राला सीरम इन्स्टिट्यूटकडून थेट लसी घेण्यासाठी आणखी महिनाभर वाट पाहावी लागणार आहे, अशी माहिती राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली.

 बातमी पण वाचा : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम घरोघरी जाऊन राबवा- नाना पटोले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button