कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय घेतील- जयंत पाटील

jayant-patil

नागपूर : सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. गेले तीन दिवस हे अधिवेशन शेतकरी कर्जमाफी, सावरकर आदी विषयांनी प्रचंड गाजले. आजही सभागृहात तेच चित्र पाहायला मिळाले . उद्धव ठाकरे सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं, अशा शब्दांत शब्दात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला . या मुद्द्यावर राष्ट्रवादी कँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले . मुख्यमंत्र्यांसोबत विविध विषयांवर चर्चा झाली.

शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न आहे. कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय जाहीर करतील, असं जयंत पाटील म्हणाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची बैठक  झाली.  त्यानंतर जयंत पाटील माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. बैठकीत शेतकरी कर्जमाफीवर चर्चा झाली. मंत्रिमंडळ विस्तार हा मुख्यमंत्र्यांचा  अधिकार आहे. विरोधक आक्रमक कुठे आहेत? ते फक्त कांगावा करत आहेत, असेही जयंत पाटील म्हणाले .

शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर नवीन सरकारकडून शेतकरी कर्जमाफीबाबत हालचाली सुरू झाल्या असून, सहकार विभागाकडून यासाठी माहिती मागविण्यात येत आहे. यामध्ये कोणते शेतकरी यासाठी पात्र ठरू शकतात, थकबाकीदार शेतक-यांची संख्या व इतर माहितीचा समावेश असून, त्यासाठी सहकार विभागाकडून ही माहिती एकत्रित करण्याचे काम सुरू झाले.