‘मास्क’ लावून शांत बसलेल्या मुख्यमंत्र्यांनी मौन सोडावे : आशिष शेलार

Ashish Shelar & Uddhav Thackeray.jpg

मुंबई :- माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर महिन्याला १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप आहे. यामुळे अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार आहेत. विरोधकांनी महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) घेरण्यास सुरुवात केली आहे. भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.  शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. “उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्यातील आघाडी सरकारचे पितळ पूर्णपणे उघडे पडले. गृहमंत्र्यांवर गुन्हा दाखल होण्याची वेळ यावी. यामुळे महाराष्ट्राची देशभरात बदनामी झाली. याला जबाबदार केवळ आणि केवळ ठाकरे सरकारच!” असे शेलार यांनी म्हटले आहे. “आता तोंड लपवायला जागा न उरल्याने नैतिक जबाबदारी स्वीकारून  गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. तसेच एवढे दिवस तोंडावर ‘मास्क’ लावून शांत बसलेल्या मुख्यमंत्र्यांनी आता तरी मौन सोडावे!” असेदेखील आशिष शेलार म्हणाले. उच्च न्यायालयाने वकील जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सुनावणीवेळी सीबीआय चौकशीचे आदेश दिले. न्यायालयाने १५ दिवसांत चौकशी पूर्ण करण्याचा आदेश सीबीआयला दिला आहे.

न्यायालयाने परमबीर यांची याचिका निकाली काढताना त्यांनी आपल्या तक्रारी सीबीआयसमोर मांडाव्यात असे स्पष्ट केले. भाजपा नेत्यांनी याआधीही ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला होता. “दुर्दैवाने एवढे मुंबई पोलिसांचे खच्चीकरण आणि बदनामी कधीच झाली नव्हती. ठाकरे सरकारचे हे पाप आहे. एका सामान्य नागरिकाचा खून, एक एपीआयला अटक, त्याच्या गाडीत नोटांची बंडलं, नोटा मोजण्याचे मशीन, गाडीत नंबर प्लेटचा खच. मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या.” असे आशिष शेलार यांनी म्हटले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button