जोरजबरदस्तीनं कृषी कायदा स्वीकारणार नाही; मुख्यमंत्र्यांचा केंद्राला इशारा

CM Uddhav Thackeray

मुंबई : जोरजबरदस्तीनं कृषी कायदा स्वीकारणार नाही. तर शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा स्वीकारणार, असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बोलून दाखवला. केंद्राच्या कृषी विधेयकावर त्यांनी मत व्यक्त करत आज (दि. ११) सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शेतक-यांच्या प्रश्नाविषयी बोलताना, मी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. ओल्या दुष्काळाची भरपाई देणार आहे, असे त्यांनी आश्वासन दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER