विधानसभा अध्यक्षपदासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा शब्द आमच्यासाठी अंतिम – उदय सामंत

सरकार स्थिर होत असतानाच नाना पटोलेंनी राजीनामा देण्याची गरज नव्हती - मुख्यमंत्री !

Uday Samant-CM Uddhav Thackeray-Nana Patole

मुंबई :  कॉंग्रेसचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडीतील घटकपक्ष नाराज असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पटोले यांच्या राजीनाम्याबाबत नापंसती व्यक्त केल्याचं बोललं जात आहे. महाविकास आघाडीचं सरकार स्थिर होत असतानाच त्यांनी राजीनामा देण्याची गरज नव्हती, अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका असल्याचं म्हटलं जातं आहे.

तर, आता सर्वांना नव्या विधानसभा अध्यक्षपदी कोण येणार याकडे लक्ष लागले आहे. त्यातच विधानसभा अध्यक्षपदाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) ठरवतील, त्यांचा शब्द शिवसैनिकांसाठी अंतिम असेल, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली आहे.

तर, दुसरीकडे नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच रहाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र हे पद आता खुलं झालं आहे असं म्हटलं होतं. पण कुणाकडे कुठली पदं राहतील हे सरकार बनतानाच निश्चित झालं आहे आणि त्यात फार बदल होण्याची शक्यता नाही असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER