महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे रुग्णालयात दाखल

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे(Rashmi Thackeray) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रश्मी ठाकरे यांची कोरोना चाचणी 23 मार्च रोजी पॉझिटिव्ह आली होती. होम आयसोलेशन असतांना अशक्तपणा झाल्याची तक्रार आल्यानंतर ANIनुसार त्यांना उपचारासाठी HN रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Chief Minister Uddhav Thackeray’s wife Rashmi Thackeray admitted to hospital)

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरच ते होम आयसोलेशन मध्ये होते. 11 मार्च रोजी रश्मी ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button