मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वाटेत अडथळे कोण आणतंय? राष्ट्रवादीचा ‘हा’ मंत्री म्हणाला…

Jayant Patil & Uddhav Thackeray

मुंबई : राज्यातील तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) समर्थपणे सांभाळत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आज मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक केले आहे .

राज्याचं स्टेअरिंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हाती आहे आणि त्यांची गाडी व्यवस्थित सुरू आहे, असे जयंत पाटील म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या वाटेत नेमके अडथळे कोणते आहेत व ते कोण आणत आहे? असे विचारले असता अडथळे आहेत हे आम्हालाही दिसतं आहे; पण त्याने त्यांना काही फरक पडलेला नाही, असे हसतच पाटील म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी एका कार्यक्रमात बोलताना, सध्या मी कार आणि सरकार दोन्ही व्यवस्थितपणे चालवत आहे. मध्ये काही खड्डे आणि अडचणी येत असल्या तरी त्याचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. माझ्या हाती स्टेअरिंग भक्कम आहे, असे सूचक विधान केले होते. या विधानावर लगेचच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टोलेबाजी केली होती. ‘उद्धव ठाकरे अत्यंत चांगल्या प्रकारे कार चालवतात हे खरं आहे; पण ते कार चालवतात तेव्हा त्यांच्यासाठी ट्रॅफिक पूर्णपणे थांबतं.’ असा खोचक टोला फडणवीस यांनी लगावला होता. या पार्श्वभूमीवर आज जयंत पाटील यांना माध्यमांनी विचारले असता त्यांनीही आपल्या खास शैलीत उत्तर दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER