मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ॲक्शन प्लॅन ; कोरोना विरुद्धच्या लढ्यात फॅमिली डॉक्टर्सना सहभागी करणार

CM Uddhav Thackeray

मुंबई : राज्यात कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी फॅमिली डॉक्टर्सची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी तयार करण्यात आलेली टास्क फोर्स त्यांना मार्गदर्शन करणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) टास्क फोर्सच्या माध्यमातून फॅमिली डॉक्टरांशी (Family Doctors) संवाद साधणार आहेत, अशी माहिती शिवसेना (Shiv Sena) खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आतापासूनच कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्याला सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून राज्यातील फॅमिली डॉक्टर्सची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात फॅमिली डॉक्टर्सना सहभागी करून घेतले जाणार आहे.

राज्यात अजूनही दैनंदिन पातळीवर ५० हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे परिस्थिती हवी तशी नियंत्रणात आलेली नाही. महाराष्ट्र कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेशी लढत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आतापासूनच कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्याला सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून राज्यातील फॅमिली डॉक्टर्सची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button