मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लिहिले राष्ट्रपतींना पत्र ; राज्यपालांची घेणार भेट!

Maharashtra Today

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण(Maratha Reservation) रद्द केले आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकारकडून नव्या प्रयत्न केले जात आहे. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) हे आज सायंकाळी 5 वाजता राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत. कोरोना परिस्थिती आणि मध्यतंरी झालेल्या वादानंतर ही पहिल्यांदाच ही भेट होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्याला नसून तो केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनाच अधिकार असल्याचं सांगितले होते. त्याप्रमाणे उद्धव ठाकरे आता थेट राष्ट्रपतींकडे हा मुद्दा मांडत आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आरक्षणाच्या मुद्दयावर पत्र लिहिले आहे, ते पत्र राज्यपालाकडे सुपूर्द करण्यात येईल.

राज्यपाल भगत कोश्यारी (Bhagat Singh Koshyari)आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट वर्षभरानंतर होत आहे. विमान प्रवासावरुन मानापमान नाट्य, राज्यपाल नियुक्त सदस्य, राज्यपालांनी लिहिलेलं पत्र, कोरोना आणि कंगाना असे अनेक वाद गेल्या वर्षभरात राज्यपाल आणि ठाकरेंमध्ये रंगले होते. त्यामुळे ही भेट कशी होते, या भेटीत काय घडतं, याकडे सर्व राजकारणी नेते लक्ष लावून बसले आहेत.

दरम्यान राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने 5 मे रोजी रद्द केला. गायकवाड समितीचा अहवाल अस्वीकारार्ह असल्याचं न्यायालयाने म्हटलं. मात्र मराठा आरक्षणांतर्गत आतापर्यंत झालेले प्रवेश रद्द होणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. 9 सप्टेंबर 2020 पर्यंत झालेले वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश वैध असल्याचेही न्यायालयाने नमूद केलं आहे. न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्याने महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का बसला आहे. मराठा आरक्षणाच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button