मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८.३० वाजता संवाद साधणार ; लॉकडाऊनमध्ये वाढ होणार?

CM Thackeray

मुंबई :- राज्यावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट आहे. राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ३१ मेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यात आता पुन्हा वाढ होणार की निर्बंध शिथिल केले जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज समाजमाध्यमांच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी संवाद साधणार आहेत. यात मुख्यमंत्री राज्यातील लॉकडाऊन संदर्भात पुढील माहिती देण्याची शक्यता आहे.

राज्यात लॉकडाऊनमध्ये वाढ केल्यास लॉकडाऊनचे नियम न पाळता दुकानं उघडू अशा इशारा याआधीच व्यापाऱ्यांनी दिला आहे. याशिवाय मुंबईत व्यापाऱ्यांच्या संघटनेनं भाजपच्या शिष्टमंडळासोबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन निवेदन देखील दिलं आहे. त्यामुळे राज्यातील व्यापारी आणि छोट्या दुकानदारांबाबत सरकार कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button