मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हवी भाटगिरी : चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil-Shivsena

कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut)यांना भाटगिरी हवी आहे. पण आम्ही भाटगिरी करणारे नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chnadrakant Patil) कोल्हापूरात केली.

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना हवं ते म्हटलं तर ते चांगले. त्यांची स्तुती म्हणजेच भाटगिरी करावी, असं दोघांना वाटत. मात्र, त्यांची चूक दाखवली तर पत्रकार देखील जेलमध्ये जातात. महाभकास आघाडीला सरकारला मराठा आरक्षण टिकवता आले नाही. राज्य सरकारकडे मराठा आरक्षणाबाबत इच्छाशक्ती नाही. मुख्यमंत्री घरी बसून राज्य चालवणारे आहेत. सरकारकडून मराठा समाजाला उल्लू बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) अध्यादेश हे उत्तर असू शकत नाही. अध्यादेश काढला तरी याचिकाकर्ते स्वस्थ बसणार नाहीत, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी सरकारला दिला आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत (SSR) आत्महत्या प्रकरणात 45 दिवसांत FIR का दाखल केला नाही, असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांना यावेळी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER