मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना महाराष्ट्राचे तेजस्वी पाणी दाखवून दिले ; केशवराव धोंडगेंकडून कौतुक

Governor Bhagat Singh Koshyari - CM Uddhav Thackeray

मुंबई : महाराष्ट्राचे (Maharashtra) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना चोख उत्तर देणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे माजी खासदार केशवराव धोंडगे यांनी खास कौतुक केले आहे. कोश्यारी यांना रोखठोक उत्तर देऊन उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे तेजस्वी पाणी दाखवून दिले असे धोंडगे यांनी म्हटले आहे.

आपल्या ‘जयक्रांती’ या साप्ताहिकात त्यांनी शिवसेनेचे प्राण, लढवय्या, कट्टर हिंदुत्ववादी असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना चोख उत्तर देऊन महाराष्ट्राचे तेजस्वी पाणी दाखवून दिले. अशा शब्दांत धोगडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कौतुक केले आहे. धोंगडेंच्या या कौतुकासाठी, त्यांच्या भूमिकेसाठी सर्वत्र कौतुक होत आहे. शेकापचे माजी खासदार केशवराव धोंगडे यांनी आपल्या भाषणांनी देशाची संसद आणि राज्याचे विधिमंडळ गाजवले आहे.

महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे उघडण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अतिशय खोचक भाषेत पत्र लिहिले होते. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘ठाकरी’ भाषेतच उत्तर दिले. असे धोंगड म्हणाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER