मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ममतादीदींना म्हणाले, ‘बंगालच्या विजयाचे श्रेय ममता बॅनर्जी या वाघिणीला’

Mamata Banerjee - CM Uddhav Thackeray

मुंबई : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा पक्ष सर्वाधिक जागांवर आघाडीवर दिसत आहे. विशेष म्हणजे ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम मतदारसंघातून यावेळी निवडणूक लढवली होती. भाजपचे (BJP) उमेदवार शुभेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) आणि ममता यांच्यात या मतदारसंघात कांटे की टक्कर बघायला मिळाली. मात्र, अटीतटीच्या लढतीत ममता बॅनर्जी यांचा १९५७ मतांनी पराभव झाला. भाजपाचे शुभेंदू अधिकारी हे विजयी झालेले आहेत. मात्र तृणमूल काँग्रेस बंगालमधील आपलं वर्चस्व राखण्यात यशस्वी ठरल्याचं आता समोर येत आहे. ममता यांच्या विजयानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे.

“ममता बॅनर्जी या बंगाली जनतेच्या स्वाभिमानाचा लढा एकट्या लढत होत्या. त्यांच्या हिमतीला दाद द्यायलाच हवी. अखेर त्यांचा विजय झालाच आहे. या विजयाचे संपूर्ण श्रेय बंगालच्या या वाघिणीलाच देणे योग्य ठरेल. पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपर्यंत संपूर्ण केंद्र सरकार, राज्यांची सरकारे ममतादीदींच्या पराभवासाठी पश्चिम बंगालच्या भूमीवर एकत्र जमली होती. त्या सर्व शक्तींची धूळधाण उडवत ममतादीदींनी विजय प्राप्त केला आहे. मी त्यांचे व हिंमतबाज पश्चिम बंगाली जनेतेचे मनापासून अभिनंदन करतो. आता राजकारण संपले असेल तर सगळ्यांनी मिळून कोरोनाविरुद्धच्या लढाईकडे लक्ष देऊया.” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button