मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान ‘मातोश्री’ उडवून देण्याची धमकी!

CM Uddhav Thackeray - Dawood Ibrahim

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निवासस्थान ‘मातोश्री’ उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती आहे . दुबईहून मातोश्री वर तीन ते चार फोन आले असून हा फोन दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) हस्तकाने केल्याचे समोर आले . या घटनेनंतर मातोश्री निवासस्थानाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान ‘मातोश्री’ उडवून देण्याची धमकी देण्यात आल्यानंतर खळबळ उडाली आहे. आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) यांनी या घटनेची माहिती घेतली असून पुढील सूचना दिल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री काही कामानिमित्त घराबाहेर पडले आहेत. उद्धव ठाकरेंचे ‘मातोश्री’ हे वांद्र्यातील खासगी निवासस्थान आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER