पंचगंगा प्रदूषणबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून गंभीर दखल

Uddhav Thackeray

मुंबई : पंचगंगा नदी प्रदूषणाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून गंभीर दखल घेतली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसी यांचे पथक संयुक्तरित्या नियमित देखरेख ठेवावे व त्याचा दर महिन्याला अहवाल देण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज बैठकीत केली. मुख्यमंत्री सचिवालयामार्फतही बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले.

पंचगंगेतील प्रदूषणासाठी जबाबदार कंपन्यांना प्रथम टाळे ठोका आणि सर्व नियमांचे पालन केल्यानंतरच त्यांना युनिट सुरू करण्यास मान्यता द्या, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले.पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी वर्षा येथे बैठक झाली. या बैठकीला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र येड्रावकर, खासदार धैर्यशील माने, खा. संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबीटकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई उपास्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER