‘हाफकिन इन्स्टिट्यूट’ची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून पाहणी ; राज्यात कोरोनाचा लसीची निर्मिती होणार?

Uddhav Thackeray - Maharastra Today

मुंबई :- राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लसीकरणाची गती वाढवण्याचे संकेत दिले आहेत. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज हाफकिन इन्स्टिट्यूटला भेट देत पाहणी केली. त्यावेळी कोरोना लसीच्या निर्मितीबाबत मुख्यमंत्र्यांनी यावेळी महत्वाची माहिती दिली आहे.

मी दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे विषय मांडला आहे. हाफकिन ही देशाला पोलिओ मुक्त करणारी संस्था आहे. तिची कल्पना पंतप्रधानांना दिली आहे. या संस्थेला पुन्हा ताकद देण्याची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. संशोधन आणि क्षमता वाढवण्यासाठी सरकार संस्थेच्या पाठीशी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटले

लस बनवणाऱ्या इतर ज्या कंपन्या आहेत. त्यांच्याशी बोलणी सुरु आहे. तसंच राज्यातील मान्यताप्राप्त संस्थेत सातत्याने संशोधन सुरु राहील, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. कोरोना लसीबाबत राजकारण करायचे नाही. केंद्र सरकारने सांगितले आहे की, तुम्हाला मागणीनुसार पुरवठा केला जाईल. त्यांनी वर्गवारी करुन दिलेली आहे. पण या संकटातून लवकर बाहेर पडण्यासाठी लसींचा पुरवठा वाढवावा लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER