वाढवण बंदराबाबत सर्वांची बाजू विचारात घेऊनच निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई  :- वाढवण बंदराबाबत केंद्र सरकारचा प्रस्ताव आल्यास केंद्र सरकार आणि स्थानिक नागरिक या दोघांची बाजू विचारात घेऊनच निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

पालघर जिल्ह्यात वाढवण येथे बंदर उभारल्यास येथील मच्छिमार आणि शेतकरी उद्ध्वस्त होतील, त्यामुळे हे बंदर होऊ नये या मागणीसाठी पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीने विधान भवन येथे मुख्यमंत्री श्री ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, कृषिमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार राजेंद्र गावित, विनायक राऊत, स्थानिक लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.


Web Title : Chief minister uddhav thackeray decided on the issue of development port

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)