मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना फोन

uddhav thackeray - dr.harshvardhan - Maharastra Today
uddhav thackeray - dr.harshvardhan - Maharastra Today

मुंबई :- राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्यात फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे राज्यातील ऑक्सिजन तुटवड्याबाबत चर्चा केली. त्यावर डॉ. हर्ष वर्धन (Dr. Harsh Vardhan) यांनी महाराष्ट्राला ऑक्सिजन कमी पडू दिला जाणार नाही, केंद्र सरकार त्यासाठी सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन दिले.

काही दिवसांपूर्वी डॉ. हर्ष वर्धन यांनी दिल्लीत पत्रकारपरिषद घेत महाराष्ट्र सरकार कोरोना परिस्थिती हाताळण्यात आपयशी ठरत असल्याची टीका केली होती. मात्र, आता मुख्यमंत्री आणि केंद्रीय आरोग्यमंत्र्यांमध्ये झालेल्या चर्चेचे फलित सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे.

ही बातमी पण वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांना 24 तासात 3 वेळा फोन ;  ऑक्सिजन तुटवड्याने महाराष्ट्र संकटात 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button