मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजन साळवींवर नाराज; नाणारबाबतची भूमिका ठरली कारण

CM Thackeray-Rajan Salvi

रत्नागिरी : सध्या कोकणात उद्योगधंदे नाहीत. स्थानिकांनी पाठिंबा दिल्यास नाणारबाबत आघाडी सरकार सकारात्मक भूमिका घेईल, असे वक्तव्य शिवसेनेचे लांजा – राजापूर मतदारसंघातील आमदार राजन साळवी यांनी केले होते. उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असून पक्षातर्फे, साळवी यांची भूमिका वैयक्तिक असल्याचे सांगण्यात येते आहे.

राजन साळवी (Rajan Salvi ) यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना नाणारबद्दल उल्लेखित वक्तव्य केले होते. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साळवी यांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, तसेच शिवसेनेचे रत्नागिरी – सिंधुदुर्गातील खासदार विनायक राऊत यांनी राजन साळवींचे ते विधान वैयक्तिक असल्याचे सांगितले.

या विधानासाठी पक्षश्रेष्ठींनी साळवींचे कान उपटले आहेत. रिफायनरी हा विषय कायमचा संपला आहे. राजन साळवींचे विधान वैयक्तिक आहे. शिवसेना, महाविकास आघाडी साळवींच्या विधानाशी सहमत नाही, असे खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केले. या मुद्यावर राजन साळवी पुन्हा एकदा एकटे पडले आहेत.

शिवसेना घेणार पत्रकार परिषद
राजन साळवींनी केलेल्या विधानावरून शिवसेनेतूनदेखील वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यातील नेत्यांना याबाबत फोन करण्यात आलेत. शिवसेना पत्रकार परिषद घेऊन ‘नाणार विषय शिवसेनेसाठी संपला’ हे पुन्हा एकदा जाहीर करेल. त्या पत्रकार परिषदेत आमदार राजन साळवी हेदेखील हजर राहतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER