अतिवृष्टिग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री सोमवारी सोलापूर दौऱ्यावर

Solapur Flood Area Visit CM Thackeray

मुंबई :- राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी, ग्रामस्थ यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत :

सकाळी ०९:०० वा.सोलापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण.

०९:३० वा.सोलापूर येथून मोटारीने सांगवी खुर्द, ता. अक्कलकोट, जि. सोलापूरकडे प्रयाण (अक्कलकोट मार्गे).

१०:४५ वा. सांगवी खुर्द  येथे आगमन व नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी व ग्रामस्थांशी चर्चा.

११:०० वा. सांगवी पुलाकडे प्रयाण व बोरी नदीची व पूरग्रस्त भागाची पाहणी.

११:१५ वा. अक्कलकोट शहराकडे प्रयाण.

११:३० वा.अक्कलकोट शहर येथे आगमन व हत्ती तलावाची पाहणी.

११:४५ वा. अक्कलकोट येथून रामपूरकडे प्रयाण.

दुपारी १२:०० वा.रामपूर येथे आगमन व अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची व शेतीपिकांच्या नुकसानीची पाहणी.

१२:१५ वा.रामपूर येथून बोरी उमरगे, ता. अक्कलकोटकडे प्रयाण.

१२:३० वा.बोरी उमरगे येथे आगमन, आपत्तिग्रस्त घरांची व शेतीपिकांच्या नुकसानीची पाहणी.

१२:४५ वा.बोरी उमरगे, ता. अक्कलकोट येथून सोलापूरकडे प्रयाण.

०३:०० वा. पूरपरिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा व अभ्यागतांच्या भेटी व नंतर सोलापूर विमानतळ येथे आगमन व मुंबईकडे प्रयाण.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER