रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रकल्प समर्थक संघटना घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

Green Refinary-CM Thackeray

रत्नागिरी(प्रतिनिधी): राजापूर तालुक्यात ग्रीन रिफायनरी व्हावी यासाठी आता रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता आक्रमक झाली असून मोठ्या प्रमाणावर प्रकल्प समर्थक पुढे येत आहेत. रिफायनरीला शिवसेनेकडून होणारा विरोध पहाता, दोन्ही जिल्ह्यातील रिफायनरी समर्थकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे निश्चित केले आहे.

रिफायनरीमुळे दोन्ही जिल्ह्यांचा होणारा विकास आणि मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध होणारा रोजगार यामुळे प्रकल्पाचे समर्थन वाढत आहे याबाबत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सकारात्मक निर्णय घ्यावा या मागणीसाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना राजकीय पक्षांचे पदाधिकारी व प्रकल्प समर्थक हे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यांच्यासमोर आपली बाजू मांडणार आहेत या प्रकल्पाला मंजुरी देण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर व सचिव अविनाश महाजन यांनी दिली आहे.