संभाजीनगरबाबत मुख्यमंत्री ठाकरेंचा निर्णय झाला; शिवसेनेचा काँग्रेसला सज्जड दम

Chief Minister Thackeray's decision regarding Sambhajinagar; Shiv Sena

मुंबई :- मागील काही दिवसांपासून राज्यात औरंगाबाद नामांतरणावरून वाद पेटला आहे. यातच महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारत भाजपा आणि शिवसेनेवरही निशाणा साधला होता. नामांतराचे राजकारण कोणाला प्रिय? पाच वर्षे सत्तेत असलेलेच ढोंगीपणा करत आहेत? अशा शब्दात काँग्रेसनं शिवसेनेला सुनावलं. तर दुसरीकडे शिवसेनेने काँग्रेसच्या आक्षेपाला दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतली आहे.

याबाबत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, औरंगजेबाच्या प्रेमात कोणीही पडू नये, महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी छत्रपती संभाजी महाराजांवरच प्रेम करावं असं मला वाटतं.

तर मतांचे राजकारण नाही, हा चांगला आणि वाईट असा विषय आहे, मतांचा नाही, छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्य संस्थापक असले तरी त्यांच्या इतका सेक्युलर राजा दुसरा कोणीही झाला नाही. औरंगजेब, बाबर ही आमची प्रतिकं होऊ शकत नाही. विरोध करणाऱ्यांनी आधी औरंगजेब समजून घेतला पाहिजे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संभाजीनगरचा निर्णय स्पष्ट केला आहे, हा लोकांच्या भावनेचा विषय आहे, यावर चर्चा होईल परंतु निर्णय झालेला आहे अशा शब्दात संजय राऊत यांनी काँग्रेसला अप्रत्यक्षपणे सज्जड दम दिला आहे.

ही बातमी पण वाचा : शिवसेनेच्या राष्ट्रीय विस्तारासाठी पश्चिम बंगालमध्ये ‘हीच ती वेळ’ – संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER