मुख्यमंत्री ठाकरेंनी सरकार नागपूरवरून चालवावे – आशिष देशमुख

Ashish Deshmukh-CM Uddhav Thackeray

नागपूर :- कोरोनाच्या रुग्णांची मुंबईत तेजीने संख्या वाढत आहे. मुंबईत पोलीस, प्रशासन अधिकारी, आयएएस, आयपीएस अधिकारी या सर्वांच्या दालनात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्या तुलनेत नागपुरात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात बरे यश येत आहे. तसेच, नागपूर सुसज्ज आहे. येथे मुख्यमंत्री कार्यालयापासून मंत्रालयापर्यंत सर्व काही उपलब्ध आहे. त्यामुळे सरकार चालवण्यासाठी जे आवश्यक आहे ते नागपुरात सहज उपलब्ध आहे. म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकार नागपूरवरून चालवण्यासाठी प्रयत्न करावे, असे काँग्रेस नेते आणि माजी आमदार डॉ. आशिष देशमुख म्हणाले आहेत.

‘कोरोनामुळे मुंबईतील स्थिती चिंतनाजनक आहे, अशा स्थितीत मुंबईतून राज्याचा कारभार चालवणे अवघड आहे. त्यामुळे राज्य सरकारचं कामकाज नागपुरातून चालवावं, यासाठी राज्य सरकारचं मुख्यालय नागपुरात शिफ्ट करावं’ अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त देशमुख यांनी मुख्यमंत्री साहाय्यता निधीत ७४ लाखांचा धनादेश दिला.

या कार्यक्रमानंतर बोलताना त्यांनी सरकार नागपुरातून चालवण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. नागपुरात कोरोना नियंत्रणात असल्यानं, राज्याचा कारभार नागपुरातून चालवावा, अशी मागणी देशमुख यांनी केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER