आज आणि उद्या मुख्यमंत्री ठाकरे कोल्हापुरात

कोल्हापूर : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज, शुक्रवारी दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. इस्लामपूर (ता. वाळवा) येथील कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर ते प्रथमच कोल्हापुरात येत आहेत. आज दुपारी ४ वाजता त्यांचे मुंबईहून कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल.

जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील चोरीचा छडा लागला

यानंतर ते हेलिकॉप्टरने इस्लामपुर कडे रवाना होणार आहेत. इस्लामपूर येथे होणाऱ्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून ते रात्री कोल्हापुरात मुक्कामाला येणार आहेत. शनिवारी सकाळी ते करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेणार आहेत. यानंतर ते विमानाने मुंबईला रवाना होणार आहेत.