मुख्यमंत्री ठाकरेंनी फडणवीसांचा आणखी एक निर्णय केला रद्द

devendra fadnavis uddhav thackeray

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून माजी मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सरकारमधील योजना काही निर्णय ठाकरे सरकार (Thackeray Government) रद्द करत आहेत आता मनोरा आमदार निसाचा बांधकामाचा विषय ठाकरे सरकारने हाती घेतला आहे. या निवास्थानाच्या पुनर्बांधणीचे काम फडणवीस सरकारच्या काळात केंद्र सरकारच्या अखत्यारीतील नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच ‘एनबीसीसी’ला देण्यात आले होते. आता हा निर्णयच राज्य सरकारने रद्द केला आहे, असं वृत्त महाराष्ट्र टाइम्सने दिले आहे. आता हे काम राज्य सरकारचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्ताधिकार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

तसंच, मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या एन.बी.सी.सी. यांच्याऐवजी पुढील काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यास तसेच या कामाच्या खर्चास तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी देण्यास उच्चाधिकार समितीने मंजुरी देण्यात आली आहे. नवीन आमदार निवासाचे काम तातडीने सुरू करून जलदगतीने पूर्ण करावे, अशा सूचना सभापती व अध्यक्षांनी यावेळी केल्या.

गेल्या अनेक वर्षांपासून मनोरा या नवीन इमारतीच्या पुनर्बांधणीचे काम सुरू होते. या कामाचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी विधानभवनात बैठक झाली.

या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), उपसभापती नीलम गोऱ्हे, सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) अशोक चव्हाण (Ashok Chavan), संसदीय कार्यमंत्री अनिल परब (Anil Parab), ऊर्जामंत्री डॉ. नितिन राऊत (Nitin Raut), मुख्य सचिव संजयकुमार, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, विधान मंडळाचे सचिव राजेंद्र भागवत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकामे) ए.बी. गायकवाड आदी या वेळी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER