मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला पाहिजे : प्रसाद लाड

Prasad Lad - CM Uddhav Thackeray - Maharashtra Today

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके सापडली. याप्रकरणी एपीआय सचिन वझे (Sachin Vaze) यांना १३ तासांच्या चौकशीनंतर ‘एनआयए’ने (NIA) अटक केली. यानंतर भाजपा (BJP) आता आक्रमक झाली आहे. सचिन वझेंची बाजू घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपाचे नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केली आहे. वझेंच्या अटकेनंतर ठाकरे सरकारवर (Thackeray Government) हल्लाबोल केला आहे.

याबाबत प्रसाद लाड यांनी ट्विट केले आहे. “अखेर सचिन वझेंना अटक झाली. मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नातील ओसामा बीन लादेनला अटक झाली आहे. सचिन वझे आणि त्याच्या गँगला पाठिशी घालणाऱ्या गृहमंत्र्यांचादेखील राजीनामा घ्यायला पाहिजे. ज्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सचिन वझे ओसामा बीन लादेन आहे, असा शब्द वापरला होता. या मुख्यमंत्र्यांनीदेखील नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला पाहिजे, ही स्पष्ट मागणी आहे.” असे प्रसाद लाड यांनी म्हटले आहे.

“सचिन वझेंच्या माध्यमातून ‘एनआयए’ने मनसुख हिरेनची केस घेऊन महाराष्ट्रात झालेल्या अनेक आत्महत्यांचे गूढदेखील उलगडले पाहिजे. सचिन वझेंच्या माध्यमातून आणखी किती लोकांच्या हत्या केल्या आहेत, याचीदेखील खात्री ‘एनआयए’ने केली पाहिजे, असे प्रसाद लाड यांनी म्हटले. वझे काल (शनिवारी) सकाळी ११ वाजताच ‘एनआयए’च्या कार्यालयात हजर झाले, तेव्हापासून त्यांची चौकशी सुरू होती. १३ तासांच्या चौकशीअंती ‘एनआयए’ने वझेंना अटक केली. यानंतर भाजपा आक्रमक झाला असून त्यांनी ठाकरे सरकार निशाणा साधला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER