‘लॉकडाउनवेळी मंत्रालयाचा नवा पत्ता राज ठाकरेंचा कृष्णकुंज होता, हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं’

RAj Thackeray & Uddhav Thackeray

मुंबई : राज्यात सतत वाढत असलेल्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी काल राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी परिस्थिती सुधारली नाही, तर लॉकडाउन करण्याचा इशारा दिला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी नाव न घेता त्यांच्या निर्णयांवर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला. आज मनसेचे सरचिटणीस आणि नेते संदीप देशपांडे(Sandeep Deshpande) यांनी मुख्यमंत्र्यांच्या संबोधनावर टीका केली आहे.

लॉकडाउन बद्ददल काय करावं असं काल मुख्यमंत्र्यांनी विचारलं. जनतेने उत्तर द्याव असं मुख्यमंत्री म्हणाले. इतके कनफ्युज मुख्यमंत्री मी आजवर बघितले नाहीत. काल मुख्यमंत्र्यांनी तज्ज्ञांशी चर्चा करणार असे सांगितले. हे तज्ज्ञ कोण समजले नाही. त्यांचा आजचा कार्यक्रम पाहिला, तर ते जीम मालक, नाटय निर्माते आणि संपादकांना भेटणार आहेत. हे सगळे तज्ञ असतील, त्यांच्याशी चर्चा करणार असतील, तर तज्ज्ञ कोण याची परिभाषा समजली पाहिजे, असे देशपांडे म्हणाले. तसेच लॉकडाउनच्या काळात आमचे राजसाहेब सगळ्यांना भेटत होते. कृष्णकुंज मंत्रालयाचा नवीन पत्ता झाला होता, हे लक्षात ठेवा. कारण तेव्हा तुम्ही घरी होता, लोकांना भेटत नव्हता, अशी टीका देशपांडे यांनी केली.

लॉकडाउन हा महाराष्ट्रातील जनतेला परवडणारा नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचाही लॉकडाउनला विरोध आहे हे मुख्यमंत्र्यांनी ध्यानात घ्यावे. आनंद महिंद्रा यांनी आरोग्य सुविधा वाढवण्याचा सल्ला दिला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ५० डॉक्टर, नर्स, आरोग्यसेवक उपलब्ध करुन द्या, असे उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की लोक स्वतहून सरकारला मदत करायला म्हणून समोर आले. प्रादुर्भाव कमी झाल्यावर त्यांना कामावर काढून टाकलं . आता लोकांच्या मनातील विश्वासहर्ता कमी झालीय, म्हणून तुम्हाला डॉक्टर, आरोग्य सेवक मिळत नाहीत. दुसऱ्याकडे बोट दाखवताय, त्यावेळी तीन बोट तुमच्याकडे आहेत, हे देखील लक्षात ठेवा, अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी सुनावले.

तुम्ही लॉकडाउन केला. वर्षभरात लोकांच्या नोकऱ्या गेल्या. दुकान बंद झाली. विजेची बील कुठून भरायची. उलट तुम्ही वीज तोडली. लॉकडाउनची भीती निर्माण करता, पण गेल्या वर्षभरात तुम्ही किती कार्यालयांशी चर्चा केली. गर्दी कमी व्हावी म्हणून वर्षभर काय उपायोजना राबवल्या. खासगी कार्यालयांशी बोललात का? मंत्रालय, महापालिका, जिल्हापरिषदे इथे कार्यालयीन वेळ बदलण्यासाठी उपयोजना केली का? असा सवाल देशपांडे यांनी विचारला.

मार्शल लोकांकडून टार्गेट पूर्ण करण्यासाठी जबरदस्ती पावत्या फडतात वर्षभर कोरोनाची टेंडर काढण्याशिवाय काय उपयोजना केल्या? अशी बोचरी टीका देशपांडेंनी केली. रस्त्यावर उतरणं आम्हाला तुमच्याकडून शिकण्याची गरज नाही. दांडुके उचलणाऱ्या पोलिसांना लोकांनी स्वत:हून मदत केली, असे देशपांडे म्हणाले.

संदीप देशपांडे यांनी लेखातील एक संदर्भ वाचून दाखवला व चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करणाऱ्या तज्ज्ञांशी चर्चा करावी. मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांशी चर्चा करुन मार्ग काढावा, अशी मुख्यमंत्र्यांना विनंती केली. कोरोनाची आकडेवारी सांगितली जाते. कोरोनाची भीती लोकांच्या मनातून कमी झाली पाहिजे. कोरोना बरा होऊ शकतो हा विश्वास सरकारने निर्माण केला, तर परिस्थिती सुधारेल असे देशपांडे म्हणाले.

ही बातमी पण वाचा : कोव्हिडमध्ये आपल्या लोकांना त्रास देत असेल तर ते महाराष्ट्र सरकार, फडणवीसांचा घणाघात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button