मुख्यमंत्री फक्त मुंबई पुरतेच – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis & Uddhav Thackeray

नागपूर :- राज्याचे असताना मुख्यमंत्री मात्र मुंबईच्या बाहेर निघत नाहीत. ते केवळ मुंबईचेच मुख्यमंत्री आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी केली. नागपूर पदवीधर मतदार संघाचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ शनिवारी नागपुरात शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात भारतीय जनता पक्षाच्यावतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या सभेला शहर अध्यक्ष प्रवीण दटके, आमदार विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, किशोर पौनीकर, प्रमोद पेंडके उपस्थित होते.

यावेळी फडणवीस म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडीकडे (Mahavikas Aghadi) युवकांना रोजगार देण्यासाठी कुठलीही योजना नाही. शिक्षण संस्थांना आमच्या काळात २० टक्के अनुदान दिले होते मात्र आता ते थांबविण्यात आले आहे. विकास कामावर स्थगिती आणून कामे थांबविली जात आहेत. केवळ मुंबईपुरताच विचार करणारे मुख्यमंत्री हे राज्याचे आहे की मुंबईचे असा प्रश्न आता जनतेला पडू लागला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर ते एकदाही विदर्भात आले नाहीत. विदर्भ वैधानिक विकास महामंडळ बंद करुन विदर्भावर अन्याय केला आहे. आघाडीतील नेत्यामध्ये एकमत नसल्यामुळे प्रत्येक विभागाचा मंत्री जनतेला दिलासा देण्यासाठी वेगवेगळ्या घोषणा करतो आणि त्यानंतर नंतर घुमजाव करत निर्णय रद्द करतो, असेही फडणवीस म्हणाले.

ही बातमी पण वाचा : …भाजपने मुंबई महापालिका शिवसेनेसाठी सोडली, चंद्रकांत पाटील यांचा गौप्यस्फोट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER