मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातून मुख्यमंत्रीच एकमेव उमेदवार, एकही इच्छुक उमेदवार नाही!

Devendra Fadnavis

नागपूर : शहरात भाजपचे शंभरावर उमेदवार लढण्यास इच्छुक असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्‍चिम आणि आमदार कृष्णा खोपडे यांच्या पूर्व नागपूरमधून एकाही इच्छुकाने लढण्याचा दावा केला नाही. त्यामुळे या मतदार संघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच एकमेव उमेदवार असणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

शनिवारी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती रविभवन येथे घेण्यात आल्या. विधानसभाध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. उत्तर, दक्षिण आणि पश्‍चिम नागपूरमध्ये अनेकांनी दावे केले आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या दक्षिण-पश्‍चिम मतदारसंघासाठी एकाही इच्छुक मुलाखतीला आला नाही. मुख्यमंत्री स्वतः येथे उमेदवार असल्याने तसेही तिकीट कोणालाच मिळणार नव्हते. महाजनादेश यात्रेदरम्यान नागपूरला आले असता त्यांनी आपण दक्षिण-पश्‍चिमेतूनच लढणार असे जाहीर केले होते. त्यामुळे येथील संभाव्य इच्छुकांचे तसेही पत्ते कट झाले होते.

पूर्व नागपूरमध्ये आमदार कृष्णा खोपडे यांची चांगले बस्तान बसविले आहे. लोकसभेत नितीन गडकरी यांना सर्वाधिक मताधिक्‍य पूर्व नागपूरनेच मिळवून दिले. खोपडे यांनी तेव्हा दिग्गज समजल्या जाणारे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे संस्थान खालसा केले आहे. ते येथून सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत.

दरम्यान, मध्य नागपूर मतदार संघातून प्रवीण दटके, गुड्डू त्रिवेदी, दीपराज पार्डीकर, यांनी

दक्षिण नागपूर मतदार संघातून नगरसेवक डॉ रविंद्र उर्फ छोटू भोयर, माजी आमदार मोहन मते, रमेश सिंगारे, बलवंत जिचकार, देवेंन दस्तूरे, दीपक चौधरी, अर्चना डेहनकर, कैलाश चुटे, आशीष वांदिले, विलास करांगले, यांनी

पश्चिम नागपूर मतदार संघातून माजी महापौर मायाताई इवनाते, भूषण शिंगणे, सुनील अग्रवाल, अश्विनी जिचकार, रमेश चोपड़े, डॉ प्रशान्त चोपडे, किशन गावंडे, नवनीत सिंग तुली, दयाशंकर तिवारी, जयप्रकाश गुप्ता, नगरसेवक प्रगती पाटिल, नरेश बरडे, बबनअवस्थी, संगीता गिरे, शारदा गावंडे यांनी,

तर उत्तर नागपूर मतदार संघातून विद्यमान आमदार डॉ. मिलिंद माने, सन्दीप जाधव, सुभाष पारधी, धर्मपाल मेश्राम, महेंद्र धनविजय, अविनाश घमगाये, बंडू पारवे, रमेश फुले, राजू बावरा, राजू हत्तीठेले, पंकज सोनकर, विद्या ठवरे, मधुसूदन गवई, बबली मेश्राम, यांनी मुलाखती दिल्या.