महाराष्ट्राला ३०० व्हेंटिलेटर्स देण्याची मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींची घोषणा; गडकरींची शिष्टाई यशस्वी

Nitin Gadkari - Jaganmohan Reddy - Maharastra Today

नागपूर : महाराष्ट्र आता कोरोना (Corona) संसर्गाशी झुंजत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर्ससाठी महाराष्ट्र केंद्राकडे आर्जव करत आहे. महाराष्ट्र संसर्गाशी झुंजत असताना आता आंध्रप्रदेश मदतीला धावला आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी (Jaganmohan Reddy) यांनी महाराष्ट्राला ३०० व्हेंटिलेटर्स देण्याची घोषणा केली आहे.

महाराष्ट्राला मदत करावी, अशी विनंती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना केली होती. नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीसंदर्भात आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. त्या चर्चेनंतर जगनमोहन रेड्डी यांनी महाराष्ट्राला ३०० व्हेंटिलेटर्स देण्याची घोषणा केली आहे, अशी माहिती नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या कार्यालयाद्वारे देण्यात आली आहे.

रेमडेसिवीरसाठी गडकरींचे प्रयत्न
महाराष्ट्र आणि नागपूरमधील रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रयत्न केले. रेमडेसिवीरसाठी नितीन गडकरी यांनी मायलन ‘व्हिटारीस इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रंजनीश बोंमजाई यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. या चर्चेनंतर नागपूरला चार हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्स पाठवण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button