मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विस्तारित इमातीचे उद्घाटन

सातारा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन झाले.

यावेळी पालकमंत्री विजय शिवतारे, सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीव नाईक-निंबाळकर, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार सर्वश्री शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, शंभूराज देसाई, जयकुमार गोरे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे आदी यावेळी उपस्थित होते.


जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विस्तारित इमारतीच्या 3393.41 चौ.मी. क्षेत्रफळाच्या बांधकामासाठी 7 कोटी 82 लाख, 3 हजार 621 रुपयांच्या अंदाजित खर्चास सार्वजनिक बांधकाम विभागाने दिनांक 28 फेब्रुवारी 2013 रोजीच्या शासननिर्णयाव्दारे मान्यता दिली होती. या विस्तारीत बांधकामासाठी एकूण 6 कोटी 22 लाख 97 हजार इतका प्रत्यक्ष खर्च आला आहे.

या सुसज्ज विस्तारीत इमारतीमध्ये आर.सी.सी. फ्रेम स्ट्रक्चर पार्कींग व दोन मजल्याच्या इमारतीमध्ये जिल्हाधिकारी दालन, निवासी उपजिल्हाधिकारी दालन, मिटींग हॉल, संजय गांधी योजना विभाग, आपत्ती निवारण विभाग, ऑडीट शाखा, रोजगार हमी योजना, स्वागत कक्ष बारनिशी, अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय उपजिल्हाधिकारी व तहसिलदार महसूल व प्रशासन करमणूक शाखा, रेकॉर्ड रुम, पुरुष महिला स्वच्छतागृहासह पार्कींगचा समावेश आहे.