मंत्री राठोडांवरील आरोपानंतर मुख्यमंत्री इन अ‌ॅक्शन ; कोणत्याही क्षणी कारवाई?

Sanjay Rathod - Pooja Chavan - CM Uddhav Thackeray

मुंबई : टिक टॉक स्टार पुजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येनं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजप (BJP) नेत्यांनी त्या मंत्र्याचं थेट नाव घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) अ‌ॅक्शन मोडमध्ये आले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी पूजा (Pooja Chavan) आत्महत्याप्रकरणातील सर्व माहिती घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे शिवसेनेचे (Shiv Sena) मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर कोणत्याही क्षणी कारवाई होण्याची शक्यता आहे. एढेच काय तर राज्य वनमंत्रीपदी असलेले शिवसेनेचे नेते संजय राठोड यांचे मंज्त्रीपद देकील धोक्यात येणार व पदावरूनही त्यांची हकालपट्टी होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

पुजा चव्हाण या तरणीच्या आत्हत्येनंतर दोन दिवसात सोशल मीडियावर काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यात. त्यानंतर भाजपने आक्रमक होत संबंधीत मंत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. एवढेच नाही तर, या क्लिपमधील आवाज शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा असल्याचं सांगत या प्रकरणी राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली होती. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी थेट पोलीस महासंचालकांनाच पत्रं लिहून या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे राठोड यांच्या अडचणीत वाढ झाली होती. तर राठोड यांच्यावर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढला होता.त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री उशिरा या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं असल्याचे वृत्त टीव्ही 9 ने दिला आहे.

पूजा चव्हाण प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला? तपासात काय तथ्य आहे? राठोड यांचा कितपत सहभाग आहे? व्हायरल क्लिपमध्ये कितीपत सत्यता आहे? त्यातील आवाज राठोडांचाच आहे का? आधी बाबतची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली असावी असं सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणी मुख्यमंत्री गंभीर असून ते राठोडांवर कारवाई करू शकतात, असंही सूत्रांचं म्हणणं आहे. त्यामुळे आजचा दिवस राठोड यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचं मानलं जात आहे.

ही बातमी पण वाचा : मंत्री संजय राठोड यांच्या बचावासाठी समर्थक आणि शिवसैनिक सरसावले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER