मुख्यमंत्री काँग्रेसला काडीची किंमत देत नाहीत – अतुल भातखळकर

Atul Bhatkhalkar & Uddhav Thackeray

मुंबई : दलित, आदिवासींच्या विकास योजनांबाबत आपण काय करणार आहात, असे काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पत्र पाठवून मुख्यमंत्री उद्धव (Uddhav Thackeray) यांना विचारले होते. आज जनतेला केलेल्या संबोधनात उद्धव ठाकरे यांनी याबाबत उल्लेखही केला नाही, यावरून मुख्यमंत्री काँग्रेसला काडीचीही किंमत देत नाहीत हे सिद्ध होते, अशी टीका भाजपाचे (BJP) आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केली.

मेट्रो कारशेडच्या मुद्द्यांवरून सुरू असलेल्या वादाबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मी अहंकारी आहे. यावरून सीएम आणि सरकारला कोर्टाने झोडपले, याबाबत केविलवाणा खुलासा करण्याचा प्रयत्न केला. त्यातही खोटे बोलले! याबाबत केंद्र सरकार नाही तर खासगी जमीनमालक न्यायालयात गेले आहेत.

कांजूरमार्ग येथे कारशेड करण्याबाबत आपण स्थापन केलेल्या मनोज सौनिक समितीने यातले अडथळे दाखवून दिले आहेत, याची आठवण देऊन भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला, हा अहवाल आपण सार्वजनिक का करत नाही?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER