आमच्या यात्रेनंतर विरोधकांना यात्रा काढण्याचा उत्साह आलाय : मुख्यमंत्री

CM Fadnavis-Mahajandesh Yatra

धुळे : भाजपाच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेनंतर विरोधकांनी काढलेल्या यात्रांवर सडकून टीका केली आहे . आम्ही यात्रा सुरू केल्यानंतर अनेकांना यात्रा काढण्याचा उत्साह आला, असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला आहे .

ही बातमी पण वाचा:- मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज जळगाव जिल्ह्यात दाखल होणार

यात्रा काढण्याची परंपरा ही भाजपाची आहे. आम्ही विरोधात असताना संघर्ष यात्रा काढली होती. आता आम्ही संवाद यात्रा काढत आहोत. आमच्या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. तसेच हे सरकारच आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकते, असा विश्वास सर्वसामन्य जनतेच्या मनात आहे .

तर दुसरीकडे विरोधकांच्या यात्रेवर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले की, ”राष्ट्रवादीने सुरू केलेल्या यात्रेची काय परिस्थिती झाली आहे, हे तुम्हाला माहीतच आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची जत्रा निघाल्याने त्यांच्या यात्रेचे काय होईल ते माहित नाही,” तसेच राज्यात पुन्हा एकदा युतीच सत्तेत येणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला .