शरद पवारांची मानसिकता ढासळली म्हणून ते हातवारे करताहेत : मुख्यमंत्री

जळगाव :- लढाई पैलवानांमध्ये होते, इतरांमध्ये नाही, अशा शब्दात हातवारे करून टीका करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावमधील सभेतून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘आम्ही नटरंग नाही, त्यामुळे तसे हातवारे करीत नाही. ते आम्हाला शोभत नाही. पवारांची मानसिकता ढासळली असल्याने असे हातवारे करीत आहेत,’असा टोला मुख्यमंत्र्यांनी पवारांना लगावला.

ही बातमी पण वाचा:- हारात घुसखोरी करणा-या कार्यकर्त्याला शरद पवारांना कोपराने ढकलले; व्हिडिओ व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पहिली सभा आज जळगावात झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर ताशेरे ओढले. खरा पैलवान कोण? हे जनता 24 ऑक्टोबरला दाखवून देईल, असेही फडणवीस म्हणाले.

ही बातमी पण वाचा : शंभर कोल्हे आले तरी सिंहाची शिकार करू शकणार नाहीत ; मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना खडेबोल

दरम्यान शरद पवारांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या दिलीप सोपल यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे बार्शीत राष्ट्रवादीकडून निरंजन भूमकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्यासाठी घेतलेल्या प्रचारसभेत बोलताना पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. ‘मुख्यमंत्री म्हणतात, इथे लढाईच नाही. कुस्तीसाठी कोणी समोर नाही. पण कुस्ती पैलवानांची होते. अशांची होत नाही,’ अशी टीका हातवारे करून पवारांनी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी जळगाव येथील सभेत प्रतिउत्तर दिले आहे .