मुख्यमंत्री आधिकाऱ्यांच्या बदल्या ‘सोई’च्या ठिकाणी करण्यात व्यस्त : मनसेचा आरोप   

Raj Thackeray & Uddhav Thackeray

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) प्रशासनावर वचक नाही. ते सध्या फक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात व्यस्त आहेत. कोणता अधिकारी आपल्या बाजूने आहे हे पाहून त्याची, त्यांना हव्या असणाऱ्या विभागात बदली करून घेण्यात उद्धव ठाकरे गुंतले आहेत, अशी टीका मनसेचे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांनी केली आहे.

सरकारने रुग्णांना ओरबाडले

कोरोनाबाबच्या अव्यवस्थेवर टीका करताना ते म्हणाले की, महाराष्ट्र सरकाने कोरोनाच्या काळात रुग्णांना ओरबाडण्याचे काम केले. पत्रकार पांडुरंग रायकर हे याचे एक उदाहरण आहे. अशी अनेक उदाहरण सध्या राज्यात दिसत आहेत. यात – अँब्युलन्स मिळाली नाही, रूग्णालयात बेड नाही, असे आहे. प्रत्यक्षात रुग्णांना उपचारच मिळालेले नाहीत. सरकाने फक्त कोरोनाच्या नावावर पैसे ओरबाडण्याचे काम केले.

सेंटर म्हणजे नावाला तंबू

पुण्यातील जंबो कोरोना सेंटरचे उद्धव ठाकरेंनी काही दिवसांआधीच उद्घाटन केले. मात्र त्याचा उपयोग काहीच नाही. हे सेंटर म्हणजे नावाला तंबू उभारले आहेत, असा टोमणा संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला मारला.

‘ग्राउंड लेव्हल’ला काय परिस्थिती आहे हे उद्धव ठाकरेंना घरात बसून कळणार नाही. यासाठी लोकांमध्ये जावे लागते. लोकांमध्ये गेल्याशिवाय प्रश्न समजत नाहीत. हे उद्धव ठाकरेंना कधी कळणार? सध्या लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. या सगळयांसाठी उद्धव ठाकरे काय करत आहेत. ते कधी बाहेर पडणार आहेत. सर्वसामान्यांना कधी दिलासा देणार आहेत, असे प्रश्न संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना विचारले आहेत.

‘मातोश्री’बाहेर कधी पडणार ?

vभाजपानेही उद्धव ठाकरेंवर टीका केली. राज्यात कोरोनाच्यासाथीचे महाभयंकर संकट असताना देखील उद्धव ठाकरे त्यांचे निवास्थान ‘मातोश्री’बाहेर पडत नाहीत, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. राज्यभरात आज व्यवस्थेत जो विस्कळीतपणा आहे, तो याआधी कधीच नव्हता असे दरेकर म्हणालेत.

काही अपवाद वगळता उद्धव ठाकरे घराबाहेर पडले आहे. मात्र, सर्वाधिक काळ घरात राहणारे उद्धव ठाकरे राज्याच्या इतिहासातील पहिलेच मुख्यमंत्री असतील, असा टोमणा प्रवीण दरेकर यांनी मारला. माझ्यासह, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील राज्यभर फिरत आहे. मात्र उद्धव ठाकरे यांना घराबाहेर पडायला वेळ नाही, असे दरेकर म्हणालेत.

कोकणात ‘निसर्ग’ वादळाने थैमान घातले. पूर्ण कोकण उध्दवस्त झाले. मुख्यमंत्र्यांना तिथे जायला वेळ मिळाला नाही. सांगलीला महापूर आला, सातारा, कोल्हापूर पाण्याखाली गेले, काल परवा चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्हा पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर निघायला तयार नाहीत, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.

कोरोना संदर्भात मंत्रालयात बैठक झाली. आम्ही सर्व नेते मंत्रालयात गेलो पण, मुख्यामंत्री, मुंबईतल्या मुंबईत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर बोलत होते, असा टोमणा दरेकर यांनी मारला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER