मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शुक्रवारी जळगाव दौ-यावर

CM Uddhav Thackeray-sharad pawar

जळगाव (प्रतिनिधी) :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे १५ रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांच्या उपस्थितीत मुक्ताईनगर येथे शेतकरी मेळावा होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी बुधवारी दुपारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिली. तसेच या मेळाव्याला महाविकास आघाडी सरकारमधील विविध विभागांचे मंत्रीदेखील उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले.