अयोध्या राम जन्मभूमीवर निर्णय देणारे सरन्यायाधीश शरद बोबडे होणार सेवानिवृत्त!

Sharad Bobade

नवी दिल्ली :- अयोध्या रामजन्मभूमी प्रकरणात निर्णय देणाऱ्या खंडपीठाचा भाग असलेले सरन्यायाधीश शरद बोबडे हे २३ एप्रिल रोजी(आज) सेवानिवृत्त होणार आहेत. अयोध्या प्रकरणी नेमल्या गेलेल्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठात त्यांचा समावेश होता. या खंडपीठात सामील असलेले आणि निवृत्त झालेले ते दुसरे न्यायाधीश आहेत. यापूर्वी न्यायमूर्ती रंजन गोगोई निवृत्त झाले. न्यायमूर्ती बोबडे (Sharad Bobade) हे भारताचे ४७ वे सरन्यायाधीश आहेत, त्यांनी १ वर्ष ५ महिने या पदावर काम केले. त्यांच्या जागी सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायाधीश व्ही.एन रमणा २४ एप्रिल रोजी सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत.

त्यानंतर आता २४ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) ज्येष्ठ न्यायाधीश एन. व्ही. रमणा हे ४८ व्या मुख्य न्यायाधीशपदी असतील. सामान्यत: सरन्यायाधीशांचा निरोप समारंभ हा सर्व प्रख्यात कायदेतज्ज्ञ आणि न्यायाधीश उपस्थित असणारा एक विशेष कार्यक्रम असतो, परंतु देश सध्या कोरोना महामारीशी झुंजत आहे. कोरोना महामारीमुळे सर्वोच्च न्यायालयात खटलाही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चालू आहे. अशा परिस्थितीत न्यायमूर्ती बोबडे यांचा निरोप समारंभही ऑनलाइन होण्याची शक्यता आहे.

एस.ए. बोबडे यांचा प्रवास
२९ मार्च २००२ रोजी शरद बोबडे यांची मुंबईच्या उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली. १२ एप्रिल २०१३ मध्ये ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. १८ नोव्हेंबर २०१९ मध्ये त्यांची सरन्यायाधीश म्हणून नेमणूक झाली. अयोध्या राम जन्मभूमी शिवाय अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांनी दिले आहे. महात्मा गांधी यांच्या हत्येची पुन्हा तपासणी करण्याची याचिका बोबडे खंडपीठाने फेटाळून लावली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button