कन्हैयाकुमारविरोधात देशद्रोहाच्या खटल्यासाठी ‘आप’ची मंजुरी; चिदंबरम यांची टीका

Arvind Kejriwal- Kanhaiya Kumar- Chindabaram

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैयाकुमार आणि इतर नऊ जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याला दिल्लीतील आम आदमी पक्षाचे अध्यक्ष दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंजुरी दिली आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि खासदार पी. चिदंबरम यांनी दिल्लीतील आप सरकारच्या निर्णयावर टीका केली. शनिवारी केलेल्या एका ट्विटमधून चिदंबरम यांनी ‘आप’वर निशाणा साधला आहे. देशद्रोहाचा कायदा नक्की काय आहे हे समजून घेण्यात केंद्र सरकार इतकेच दिल्ली सरकार अपयशी ठरले आहे.

कन्हैयाकुमार आणि इतरांविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्याला हिरवा कंदील दाखविण्याच्या दिल्ली सरकारच्या निर्णयाचा मी विरोध करतो. या निर्णयाशी मी सहमत नाही.

कन्हैयाकुमारवर देशद्रोहाचा खटला चालवण्यास केजरीवाल सरकारची मंजुरी