चिदंबरम यांनी तुरुंगातून सुटल्यानंतर घेतली थेट सोनिया गांधी यांची भेट

Chidambaram-Sonia Gandhi

नवी दिल्ली: दिल्लीतील तिहार तुरुंगात तब्बल 106 दिवस घालवल्यानंतर रात्री चिदंबरम तिहारमधून बाहेर आले त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केले. चिदंबरम यांचा मुलगा कार्तीही त्यांच्या स्वागताला हजर होते. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर चिदंबरम हे थेट सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी रवाने झाले. चिंदबरम आयएनएक्स मीडिया प्रकरणात गेली काही महिने तिहार तुरुंगात आहेत.

चिदंबरम तुरुंगात असताना सोनिया गांधी यांनी त्यांची तुरुंगात जाऊन भेट घेतली होती. चिदंबरम हे उद्या संसदेत उपस्थित राहतील असं कार्ती यांनी सांगितलं.

महाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते सोनिया गांधींची घेणार भेट

सर्वोच्च न्यायालयाने 2 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि देश सोडून न जाण्याच्या अटीवर चिदंबरम यांना जामीन मंजूर केला आहे. आयएनएक्स मीडिया घोटाळाप्रकरणी चिदंबरम यांना ईडीने अटक केली होती. गेल्या 106 दिवसांपासून चिदंबरम तिहारमधील तुरुंगात होते.

दिल्ली उच्च न्यायालयात चिदंबरम यांनी जामीनासाठी याचिका दाखल केली होती. मात्र कोर्टाने ती याचिका फेटाळून लावली होती. चिदंबरम यांनी कोर्टाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. जामीन मंजूर करत असताना देश सोडू न जाण्याबरोबरच चिदंबरम यांना पत्रकार परिषद देखील घेता येणार नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.