छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये मोठ्या उत्साहात साजरी

Satej Patil Shiv Jayanti

कोल्हापूर : जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली पालकमंत्री नामदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील, यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस हार घालून प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष मा. प्रल्हाद चव्हाण, जि. प. अध्यक्ष बजरंग पाटील, महापौर निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते, यांची प्रमुख उपस्थिती होती शिवजयंती निमित्ताने वक्‍त्यांनी छत्रपती शिवरायांच्या विविध पैलूवर मध्ये व्यक्त केली.

पेद्रेवाडीच्या वृद्धेचा वणव्यात होरपळून मृत्यू

मा. सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांनी छ. शिवरायांच्या विचारावरच काँग्रेस पक्षाची वाटचाल चालू असून भविष्य काळामध्ये शिवरायांच्या विचारांचाच महाराष्ट्र घडविण्यासाठी कटिबद्ध राहू असे प्रतिपादन केले. यावेळी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महिलांच्या संरक्षणास कटिबद्ध राहीन व महिलांचे संरक्षण करीन. कोणत्याही स्त्रीवर अत्याचार करणार नाही आणि करू ही देणार नाही छत्रपती शिवरायांचा पर स्त्री मातेसमान आहे हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रतिज्ञा केली. ही प्रतिज्ञा सौ. चंदा बेलेकर यांनी सर्व कार्यकर्त्यांना दिली.

स्वागत संपतराव चव्हाण पाटील यांनी केले सदर कार्यक्रमास खालील सर्वश्री ऍड. गुलाबराव घोरपडे, ऍड. सुरेश कुराडे, जिल्हा सचिव संजय पवार (वाईकर), प्रदेश चिटणीस तोफिक मुलांनी, महमदशरीफ शेख, किशोर खानविलकर, संध्या घोटणे, सरलाताई पाटील, सुलोचना नाईकवडे, प्रदीप चव्हाण, एस. के. माळी, वैशाली महाडिक, प्रा. अनुराधा मांढरे मंगल खुडे, उज्वला चौगुले, निर्मला सालढाणा, विक्रम जरग, उदय चव्हाण, यशवंत थोरवत, सुजित्सिंह देसाई विजयसिंह माने डॉ. प्रमोद बुलबुले, आकाश शेलार, उमेश पोलेॅकर, तानाजी लांडगे संग्राम गायकवाड, अशोक गायकवाड, संजय पन्हाळकर विजयानंद पोळ, प्रदीप शेलार, मुनाफ बेपारी, आर. के. देवणे, दयानंद देसाई, विश्र्वास नांगरे, रणजित पाटील, अजित देसाई, बाबुराव कांबळे, इ. कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित होते.