छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला, शिवप्रेमींमध्ये नाराजी, विधानसभेत गदारोळ

मुंबई : काही महिन्यांपूर्वी कर्नाटकात आणि मध्य प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj)  पुतळा हटवल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे . कोणतीही पूर्वसूचना न देता प्रशासनाने महाराजांचा पुतळा हटवल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजी पसरली होती, आता हीच घटना महाराष्ट्रच्या लातूर जिल्ह्यात घडली आहे, हा मुद्दा भाजपाचे नेते आणि माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी विधानसभेत मांडत महाराष्ट्र सरकार निजामी सरकार असल्याची टीका केली .

संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले की, ज्यांच्यामुळे महाराष्ट्र घडला आहे, अशा छत्रपती शिवाजी महाराज यांचा विषय विधानसभेत मांडू न देणे हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे. लातूरच्या रायवाडी येथे १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा गावकऱ्यांनी वर्गणी काढून उभारला होता, परंतु प्रशासनाने कोणाचीही याबाबतीत एकही तक्रार नसताना हा पुतळा काढून टाकला असे त्यांनी सांगितले.

कर्नाटकात अशाप्रकारे महाराजांचा पुतळा हटवला होता त्यावेळी सरकारसोबत आम्हीसुद्धा त्याठिकाणी जाऊन छत्रपतींचा पुतळा पुन्हा बसवला, मात्र महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा हटवण्याचं काम या ठाकरे सरकारने केलं आहे, येत्या १५ दिवसांत जर सरकारने शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा बसवला नाही तर लातूरसह संपूर्ण मराठवाड्यात याचे तीव्र पडसाद उमटतील असा इशारा भाजपा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सरकारला दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER