पालीच्या खंडोबासमोर छत्रपती शिवाजी महाराजांनी सोडवला होता पाटीलकीचा वाद!

Chhatrapati Shivaji Maharaj had settled the dispute of Patilki in front of Khandoba of Pali!

सातारा – कोल्हापूर महामार्गावर काळीशच्या पश्चिमेला असणाऱ्या पालीच्या खंडोबा देवालयास लाखो भाविक श्रद्धेने भेट देतात. या पालीचा खंडोबाचा महिमा जसा वर्तमानात सर्वत्र पसरला आहे अगदी तसाच शिवकालीन इतिहासातही त्याचे दाखले सापडतात. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीसाठी मराठा सरदारांना एकत्र केले. पण हे काम एखाद्या अग्नि दिव्यापेक्षा कमी नव्हते. कित्येक पिढ्या चालत आलेले शत्रुत्व नाहीसे करुन सरदारांमध्ये बंधुभाव निर्माण करण्यासाठी शक्य ते सारे मार्ग महाराजांनी अवलंबले आणि गमिनाविरुद्ध फौज उभी केली. साताऱ्याच्या काळभोर आणि खराडे यांच्यातील पाटिलकीचा वाद महाराजांनी पालीच्या खंडोबाच्या (Khandoba of Pali) साक्षीने सोडवला होता.

पाली येथील रवादिव्य

छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) उपस्थीतीत साताऱ्यातील पालीमधली खंडोबा मंदिरात काळभोर व खराडे यांच्यातील पाटिलकीच्या वादाचा निर्णय रवादिव्याने केला होता. रवा म्हणजे कण, सोन्याचा किंवा चांदीचा तुकडा गरम तेलात टाकला जाई. आणि गरम तेलातील तुकडा हाताच्या बोटाने बाहेर काढयला लागे. निवाड्यासाठी देवळात छत्रपतींच्या समवेत त्यांचे प्रधान, सेनापती, मुजुमदार, वाकेनीस असे राजमंडळ आणि २५० वतनदार हजर होते. या रवादिव्यात काळभोर पाटील जिंकले, आणि खराडे हरले. पुढे अनेक निवाड्यांमध्ये या दिव्याचा आणि खराडे पाटलांच्या खोटेपणाचे उदाहरण शिवाजी महाराजांनी अनेकांना दिले.

ऐतहासिक संदर्भ

इतिहास संशोधक शंकरराव देव यांना या निवड्याची मोडी लिपीतील प्रत १९३० ला मिळाली. आजही काळभोर पाटलांच्याकडे सोन्या- चांदीचे शिक्के व मोहर आहेत. काळभोर येथली पाटीलपद ते अभिमानाने मिरवतात आणि पालीच्या खंडोबाचे मानाचे पानही तेच घेतात.

छत्रपती शाहू महाराजांनीही पालीच्या खंडोबा देवालयात केला निवाडा

आग्र्यातून सुटुन शाहू महाराज महाराष्ट्रात आले आणि साताऱ्याच्या गादीचे छत्रपती झाले. यानंतर दौलतीतील न्यायनिवाडा करण्याचे काम छत्रपती या नात्याने त्यांचावर होते. त्यांच्या कारकिर्दीत श्रीनिवास पंडीत यांच्या उपस्थीतीत हिरोजी इंगुळकर व पिराजी नाईक- कोंडेदेशमुख यांच्या पाटीलकीचा निवडा रवादिव्याने केला होता. इंगुळकर दिव्यास खरे उतरले आणि पाली येथील दिव्याचे जयपत्र पालीच्या वतनदारांच्या साक्षीनिशी हिरोजी इंगुळकरांना मिळाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER