ठाकरे सरकारने पोलीस भरतीचा घेतलेला निर्णय हा मूर्खपणाचा ; छत्रपती संभाजी राजेंची टीका

Chhatrapati Sambhaji Raje -Uddhav Thackeray.jpg

मुंबई : महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) 12 हजार 500 जागांच्या पोलीस भरतीचा (police recruit) घेतलेला निर्णय हा मूर्खपणाचा आहे अशा शब्दात राज्यसभा सदस्य छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray govt) टीकास्त्र सोडले .

ठाकरे सरकारच्या या निर्णयामुळे राज्यात मराठा समाजही पेटून उठला आहे. अनेक ठिकाणी आज आक्रमक आंदोलनाला सुरूवात झाली आहे. मराठा आरक्षणाची सध्या लढाई सुरू आहे आणि यात राज्यात कोरोनाचा प्रकोप आहे. अशावेळी पोलीस भरती करणे कितपत योग्य आहे असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला आहे .

दरम्यान महाराष्ट्रात 12 हजार 500 पोलिसांची भरती ( Maharashtra police bharti 2020) केली जाणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. या प्रस्तावाला मंत्रिमंडळाकडूनही मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या राज्यातील बेरोजगार तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण असे असलं तरी याचा फायदा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना होणार नसल्यामुळे राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER