माझी खुर्ची समाजाबरोबर, समाजावर नको : संभाजीराजे

मुंबई :- आपण राजे घराण्याचा सन्मान राखलात, आमच्यासाठी दोन मोठ्या खुर्च्या ठेवल्या. पण मी त्यावर बसणार नाही. मी माझ्या समाजासोबतच खाली बसणार, अशी भूमिका खासदार छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी घेतली. मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) पुढील दिशा ठरवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. संभाजीराजे यांनी आयोजकांना आपल्याला अशा प्रकारे वेगळी वागणूक देऊ नये, अशी विनंतीही केली. मी इथे येतोय म्हणजे मी समाजाचा घटक म्हणून येतो. ज्यावेळी मानपान घ्यायचा त्यावेळी पुढाऱ्यांकडून आम्ही तो बरोबर घेतो.

माझीसुद्धा खुर्ची समाजाच्या बरोबर हवी, समाजाच्या वर नको, असे संभाजीराजे यांनी म्हटले. संभाजीराजे यांनी उपस्थितांना राजर्षी शाहू महाराज यांच्यासंदर्भातील एक किस्सा सांगितला. शाहू महाराज मराठा समाजाच्या एका कार्यक्रमात गेले होते. त्यावेळी शाहू महाराजांनी आपल्या भाषणात मी तुमचा सेवक असल्याचे सांगितले. मी छत्रपती घराण्यातील असलो, मी राजे जरी असलो तरी, मी समाजाचा सेवक असल्याचे सांगत राजर्षी शाहू महाराज खाली बसल्याची आठवण संभाजीराजे यांनी सांगितली. दरम्यान या बैठकीच्या निमित्ताने उदयनराजे आणि संभाजीराजे पहिल्यांदाच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर एकत्र येणार होते. पण ऐनवेळी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांनी बैठकीला येणे रद्द केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER