मराठा आरक्षणासंदर्भात छत्रपती संभाजीराजे भोसले भूमिका जाहीर करणार ; ट्विट करत दिली माहिती

sambhaji raje - Maharashtra Today

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द ठरविल्यानंतर मराठा समाजाने पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण चांगलेच पेटले आहे. या ट्विटमध्ये संभाजीराजे यांनी आपण मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर लवकरच भूमिका मांडणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता संभाजीराजे आरक्षणासाठी सामोपचाराची का सरकारविरुद्ध एल्गार करण्याची भूमिका घेणार, याकडे पाहावे लागेल .

केंद्र व राज्य सरकार दोघांनीही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. राज्य सरकारने प्रयत्नांमध्ये कुठेही कसर ठेवली नाही. त्यामुळे आता केंद्र व राज्य सरकारने मिळून यावर मार्ग काढावा, असे संभाजीराजे यांनी सुचविले होते. दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण सातत्याने तापताना दिसत आहे. मराठा नेत्यांनी राज्यभरात मोर्चे काढण्याची तयारी सुरू केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button